VIDEO : पाहा रणवीर आलियाने 'असे' केले कभी खुशी कभी गमच्या सीनचे रिक्रिएशन - इब्राहिम अली खान
मुंबई - कभी खुशी कभी गम (20 YEARS OF KABHI KHUSHI KABHIE GAM) चित्रपटात शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात करीना कपूरची पू ही व्यक्तिरेखाही खूप आवडली होती. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने हा आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे. याचा एक व्हिडिओही अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट पूच्या (Alia Bhatt as pooja) भूमिकेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये आलियाने करीनाची कॉपी केली आहे. या व्हिडिओमध्ये अमृता सिंग आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) देखील दिसत आहे. हा सीन रिक्रिएट करताना, आलिया तिच्यासोबत प्रॉमला जाण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या कॉलेज मुलांना पॉइंट देते, जिथे एकाला 2 पॉइंट मिळतात, तर दुसऱ्याला 5. मनोरंजनाचा सर्वात मजेदार भाग येतो जेव्हा आलिया इब्राहिमला मायनस पॉइंट देते. त्यानंतर रणवीर सिंग (Ranveer Singh) हृतिकच्या अवतारात उभा राहतो आणि तो आलिया भट्टला 2 नंबर देतो.