टायगर, रितेश आणि श्रद्धाने उलगडले 'बागी ३' च्या शूटिंगचे धमाल किस्से - Baghi 3 release date
मुंबई - 'बागी' चित्रपटाचा तिसरा भाग 'बागी ३' हा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या ६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफ, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. सध्या हे तिघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या तिघांनीही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिघांनी कशी धमाल केली, हे सांगितले आहे. पाहा त्यांचा हा व्हिडिओ....