भाऊ शौमिकसह जीमच्या बाहेर दिसली रिया चक्रवर्ती - रिया चक्रवर्तीचा भाऊ शौमिक चक्रवर्ती
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला मुंबईच्या खार परिसरात कॅमेऱ्यात टिपण्यात आले. तिच्यासोबत भाऊ शौमिक चक्रवर्तीदेखील होता. जीममधून बाहेर पडत असताना हौशी फोटोग्राफर्सनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. गेल्या वर्षी दोघांनाही ड्रग प्रकरणात अटक झाली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची प्रेयसी अशी रिया चक्रवर्तीची ओळख आहे.