रील लाईफमधील व्हिलन, आणि रिअल लाईफमधील हिरो; पाहा सोनू सूदची विशेष मुलाखत! - सोनू सूद मुलाखत
पडद्यावर बऱ्याच वेळा व्हिलन साकारणारा सोनू सूद, खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांसाठी हीरो ठरला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर विविध राज्यांमध्ये अडकले होते. या सर्वांच्या मदतीला शासनापेक्षाही तत्परतेने पोहोचला तो सोनू सूद. परप्रांतीय कामगारांना केलेली मदत असो, वा एका गरीब शेतकऱ्याला दिलेला ट्रॅक्टर असो.. सोनू हा लोकांच्या मनात एक हीरो म्हणूनच राहिला आहे. यानंतर आता तो लोकांना काम शोधण्यासाठी मदत करणारे अॅप बनवत आहे. या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने त्याच्याशी चर्चा केली. पाहूयात ही विशेष मुलाखत...