B'Day Spl : 'बबली गर्ल' ते 'मर्दानी', 'या' आहेत राणीच्या खास भूमिका - Rani Mukerji character
मुंबई - बॉलिवूडची 'बबली गर्ल' राणी मुखर्जीचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म २१ मार्च १९७८ साली मुंबईत झाला होता. तिने १९९७ साली आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. अशोक गायकवाड यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'राजा की आएगी बारात' हा तिचा पहिला पदार्पणीय चित्रपट होता. त्यानंतर तिने एकापेक्षा एक दमदार चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या काही खास भूमिकांविषयी.....