कॅन्सर सर्जरीसाठी मदत करणाऱ्या सलमानला राखी सावंतची आई म्हणते, 'देवदूत' - राखी सांवतने मानले सलमान खानचे आभार
अभिनेत्री राखी सावंतने सुपरस्टार सलमान खानचे आभार मानल्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला आहे. सध्या तिची आई जया मुंबईतील रूग्णालयात कर्करोगाचा उपचार घेत आहे. सोमवारी राखीने इन्स्टाग्रामवर शेअर केले की ट्यूमर काढून टाकण्यासाठी तिच्या आईची दुसर्यांदा शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी तिला सलमान खानने मोठी मदत केली आहे. संकटाच्या काळात मदत करण्यासाठी सलमानच्या रुपाने येशून देवदूत पाठवला असल्याचे राखीच्या आईने म्हटलंय.