Public Review : कसा आहे नवाजुद्दीन - अथियाचा 'मोतीचूर चकनाचूर', पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया... - athiya shetty in motichoor chaknachur
मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अथिया शेट्टी यांची जोडी असलेला 'मोतीचूर चकनाचूर' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनचं नवं रुप पाहायला मिळते. तसेच, अथियाच्या अभिनयाचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट मनोरंजनासोबतच एक चांगला संदेशही देत असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे. संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा असा हा चित्रपट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया.....