कोलकात्यातील बच्चन धाममध्ये सलग २४ तास अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना - २४ तास अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना
कोलकाता : भारताची सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या कोलकातामध्ये बॉलिवूड मेगास्टार अमिताभ लवकर बरे व्हावेत यासाठी यज्ञ आणि पूजा होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी या यज्ञाचे आयोजन केले आहे. कोलकात्याच्या श्यमाबाजारमध्ये आयोजित केलेल्या या धार्मिक कार्यक्रमात लोक श्रध्देने प्रार्थना करीत आहेत. बोंदेल गेट येथील बच्चन धाममध्ये अमिताभ यांच्यासाठी २४ तास प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे.