फोटोग्राफर्स डायरी : आमिर खान, कार्तिक आर्यनसह शनाया कपूर कॅमेऱ्यात बंद - कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा धमाका
मुंबई (महाराष्ट्र) : सुपरस्टार आमिर खान मंगळवारी वांद्रे येथील डबिंग स्टुडिओबाहेर दिसला. तो आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. देखणा अभिनेता कार्तिक आर्यनदेखील मुंबईत फिरताना आढळून आला. तो आगामी धमाका या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर मुंबई विमानतळावर क्लिक झाली. सुंदर अभिनेत्री शनाया कपूर शहरात फिरताना कॅमेराबंद झाली. ती लवकरच धर्मा प्रडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.