पहिल्यांदा ऋषी कपूर यांना भेटल्यावर पल्लवी जोशीची अशी झाली होती अवस्था, शेअर केली आठवण - Rishi Kapoor First meet wioth pallavi Joshi
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांना चाहत्यांसह कलाविश्वातील कलाकार देखील आदरांजली वाहत आहेत. अभिनेत्री पल्लवी जोशीनेही ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या भेटीची एक आठवणही शेअर केली आहे. पल्लवी जोशीने ईटीव्ही भारतशी संवाद साधताना ऋषी कपूर यांच्याविषयी बरेच किस्से उलगडले आहेत.