प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चित्रपट केले पाहिजेत : जॉन अब्राहम - मुंबई सागा
जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, रोहित रॉय, गुलशन ग्रोव्हर, काजल अग्रवाल या बॉलिवूड कलाकारांनी 'मुंबई सागा'च्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. संजय गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या हा ३ मिनिटांचा ट्रेलर गन आणि गुंडांबद्दल आहे. जॉन बॉम्बेवर राज्य करण्याची इच्छा असलेल्या एका गुंडाची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर इमरान हाश्मी एक पोलीस अधिकारी आहे जो जॉनला ठार मारू इच्छित आहे आणि दहा कोटी रुपयांच्या बक्षिसाची रक्कम जिंकू इच्छित आहे. यावर्षी हा चित्रपट ११ मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.