एमटीव्ही मुव्ही अँड टीव्ही अवॉर्ड्स : मॅडलिन क्लाइनने घेतले चेस स्टोक्सचे चुंबन, स्कार्लेटच्या डोक्यावर हिरवा रंग - स्कार्लेट जॉहान्सनला जनरेशन अवॉर्ड
अमेरिकन गायिका अभिनेत्री स्कार्लेट जॉहान्सन ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेली ३० वर्षे कार्यरत आहे. १६ मे रोजी पार पडलेल्या एमटीव्ही मुव्ही अँड टीव्ही अवॉर्ड्समध्ये तिला जनरेशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ती आयोजकांचे, सहकलाकारांचे, चाहत्यांचे आभार मानण्यासाठी ऑनलाईन भाषण करीत होती. हातातील पुरस्कारासह सद्गदित झालेल्या स्कार्लेटच्या डोक्यावर तिचा नवरा कोलिन जोस्ट याने हिरवा रंग ओतला. अचानक झालेल्या या हस्तक्षेपामुळे ती भडकल्याचे दिसले. मात्र सर्वजण यावर हसत होते. बेस्ट किसची ट्रॉफी जिंकल्यामुळे 'आऊटर बँक' फेम चेस स्टोक्स आणि मॅडलिन क्लाइनने चीअर्स करीत चुंबन घेतले. रविवारी हा पुरस्कार सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. या शोचे सूत्रसंचालन लेस्ली जोन्स यांनी केले.