मराठी मनोरंजनाचा पेटारा उलगडला, प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च - प्लॅनेट मराठी सीओओ अक्षय बर्दापूरकर
मुंबई - प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोगो आज लॉन्च करण्यात आला. उद्यापासून हा ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनासाठी खुला झाला असून हा अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन अभिनेत्री अमृता खानवीलकरने केले. या लोगो लॉन्च प्रसंगाचे प्रस्ताविक अभिनेता पुष्कर श्रोत्रीने केले. प्लॅनेट मराठीची सीओओ अक्षय बर्दापूरकर यांनी या प्लॅटफॉर्म उभारणीसाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आणि मराठी इंडस्ट्रीने केलेल्या सहकार्याबद्दलही खास उल्लेख केला.