सुशांतच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी, मनोज तिवारींनी केली मागणी - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या
अभिनेता सुशांत सिंह राजपूने केलेल्या आत्महत्येचा पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार आणि भोजपूरी स्टार मनोज तिवारी यांनी बॉलिवूड माफियावर प्रश्न उपस्थित केले आहेत. छोट्या शहरातून मुंबईत जाणाऱ्या होतकरु मुलांच्या बाबतीत हे नेहमी घडत आल्याचे त्यांनी सांगितले. सुशांतच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मनोज तिवारी पाटण्यात दाखल झाले असताना बोलत होते. सुशांतच्या आत्महत्येची सखोल चौकशी झाली पाहिजे असे मत तिवारी यांनी बोलून दाखवले.