स्वतःच्या कॅमेऱ्याने पहिला भारतीय सिनेमा बनवणाऱ्या 'या' मराठमोळ्या कलामहर्षींचा पाहा अद्भूत प्रवास... - महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना
कोल्हापूर - ही अद्भूत गोष्ट आहे स्वतःचा कॅमेरा बनवून त्याच कॅमेऱ्याने सिनेमा बनवणाऱ्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची. कोरीव काम, चित्रकला आणि मुर्तिकला यात पारंगत असलेल्या बाबूराव यांनी हा अचाट पराक्रम १०० वर्षापूर्वी भावाच्या मदतीने कोल्हापुरात केला होता. महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना करुन त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली. भारतीय बनावटीचा कॅमेरा, खरी स्त्री पात्रे, अस्सल भारतीय कथानक, स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारे संदेश यामुळे बाबूराव पेंटर यांना लोकमान्य टिळक यांनी 'सिनेमा केसरी' अशी पदवी दिली होती. कलामहर्षींचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात ईटीव्ही भारतच्या या खास रिपोर्टमधून...
Last Updated : Feb 13, 2020, 10:43 PM IST