काजोल फ्रूट निन्जा स्टंट व्हिडिओमुळे होतीय ट्रोल - काजोलचा व्हिडिओ व्हायरल
काजोलने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक फ्रूट निन्जा स्टंट व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती चाकूने सफरचंद हवेत चिरताना दिसते. काजोलच्या या व्हिडिओचे काहीजणांनी कौतुक केले असले तरी असंख्य नेटिझन्सना तिचा हा व्हिडिओ आवडला नाही. अन्नाची नासाडी केल्याबद्दल तिला अनेकांनी ट्रोल केले.