जॉन अब्राहमने धानिपूरच्या हवाई धावपट्टीवर केले 'अॅटॅक'चे शूटिंग - जॉन अब्राहमने केले 'अॅटॅक'चे शूटिंग
अभिनेता जॉन अब्राहम २० फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या अलिगढमधील धानिपूरच्या हवाई धावपट्टीवर कॅमेऱ्यात कैद झाला. जॉन सध्या 'अॅटॅक' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. जॉन अब्राहम आल्याची खबर लागताच आजूबाजूच्या वस्तीतील लोकांनी एकच गर्दी केली. यावेळी रनवेवर अॅक्शन सीन शूट करण्यात आला. हा सिनेमा १३ ऑगस्ट २०२१ रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल.