महिला दिन विशेष : कर्तृत्ववान एकता कपूरचा इंटर्नशीप ते पद्मश्रीपर्यंतचा संघर्षमय प्रवास
मुंबई - टीव्ही, चित्रपट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म अशा प्रत्येक मनोरंजन क्षेत्रात स्वतःचा अनोखा ठसा उमटवणाऱ्या महिलेची ही गोष्ट. 'कंटेण्ट क्विन' अशी ओळख असलेल्या एकता कपूरचा जीवन प्रवास प्रेरणादायी आणि तितकाच संघर्षाचा आहे. एकताने महिला प्रधान टीव्ही शोमधून महिलांच्या आत्मसन्मानाचा आदर्श घालून दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने तिच्या या कर्तृत्वाला सलाम करीत 'ईटीव्ही भारत'च्या वतीने तिचा इंटर्नशीप ते पद्मश्रीपर्यंतचा संघर्षमय प्रवास तुमच्या समोर ठेवत आहोत.