Birthday Special: करिना कपूरचा फिल्मी प्रवास - Kareena Kapoor films
आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री करिना कपूर खान हिचा आज ३९ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडची 'बेबो' अशी ओळख असणाऱ्या करिनाचा जन्म २१ सप्टेंबर १९८० साली मुंबईत कपूर घराण्यात झाला होता. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी आणि ६ फिल्मफेअर अवार्ड्स आपल्या नावी करणाऱ्या करिनाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिचा फिल्मी प्रवास..