Video: सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; शहनाझ गीलची प्रकृती बिघडली - Shahnaz Gill video
मुंबई - अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आज ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. कूपर रुग्णालयातून अंत्ययात्रा निघाली. यावेळी सिद्धार्थ याची मैत्रीण अभिनेत्री शहनाझ गील ही देखील अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत दाखल झाली होती. यावेळी कारमध्ये ती रडत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सिद्धार्थच्या जाण्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची प्रकृतीही ठीक नसल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.