सुशांतसिंहच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पाटण्यात पोहोचले नाना पाटेकर - प्रसिध्द अभिनेता नाना पाटेकर
पाटणा - प्रसिध्द अभिनेता नाना पाटेकर पाटणा येथील राजीव नगर परिसरातील सुशांतसिंहच्या घरी दाखल झाले. त्यांनी सुशांतचे वडिल के. के. सिंह यांची भेट घेतली आणि सुशांतच्या प्रतिमेसमोर श्रध्दांजली वाहिली. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांसोबत असल्याचे यावेळी नाना यांनी सांगितले. सुशांत एक हरहुन्नरी कलावंत होता. त्याच्या जाण्याने नाना भावूक झाल्याचे दिसले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.