Exclusive : सारा-कार्तिकने उलगडला 'लव्ह आज कल'चा प्रवास, पाहा मुलाखत - romantic-drama by Imtiaz Ali
मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची जोडी पहिल्यांदाच 'लव्ह आज कल' या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाचीही उत्सुकता आहे. येत्या 'व्हॅलेन्टाईन डे'ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सारा आणि कार्तिक या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. अलिकडेच ते गुजरात येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रवाना झाले होते. दरम्यान या चित्रपटात एकत्र भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता, याबद्दलचा प्रवास त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना उलगडला आहे.