Exclusive Interview: कसा होता 'हॅप्पी, हार्डी अँड हिर'चा प्रवास, हिमेशने उलगडले किस्से - Himesh Reshammiya on Happy Hardy And Heer film
मुंबई - बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार ते अभिनेता बनलेला गायक हिमेश रेशमिया त्याच्या आगामी 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. पंजाबी अभिनेत्री सोनिया मान यामध्ये त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करत आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल हिमेशने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला आहे.