'लव्ह आज कल': सारा - कार्तिकच्या 'ईटीव्ही भारत'शी दिलखुलास गप्पा - Love Aaj Kal news
मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांची मुख्य जोडी असलेला 'लव्ह आज कल' हा चित्रपट येत्या 'व्हॅलेन्टाईन डे'ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कार्तिक आणि साराचा प्रमोशनदरम्यान रोमॅन्टिक अंदाजही पाहायला मिळत आहे. दरम्यान दोघांनी 'ईटीव्ही भारत'शी दिलखुलास संवाद साधला. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला.