ईटीव्ही भारत विशेष मुलाखत : "आँख्या का काजल" फेम सपना चौधरीची 'स्ट्रगल स्टोरी'.. - ईटीव्ही भारत विशेष सपना चौधरी
हरियाणाची प्रसिद्ध डान्सर, ते बिग बॉसमधील स्टार आणि आता राजकारणी असा प्रवास केलेल्या सपना चौधरीने 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिली. यामध्ये तिने आपल्या एकूण कारकीर्दीविषयी गप्पा मारल्या आहेत. तिने सांगितले, की करिअरच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला तिच्या शोला केवळ पुरुषच उपस्थिती लावत होते. मात्र, यामध्ये हळूहळू बदलही घडताना दिसून येत आहे, जे सकारात्मक असल्याचे तिने सांगितले. आता आपल्या कार्यक्रमांना लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीही आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याचे तिने म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्येही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असल्याचे तिने सांगितले. तसेच, कोरोना विषाणूला लोकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे असे आवाहनही तिने केले...