रणवीर-दीपिका मुंबईला परतले, सुट्टीचे रहस्य गुलदस्त्यातच - रणवीर- दीपिका मुंबईला परतले
मुंबई - बॉलिवूडची ख्यातनाम जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी परदेशात गेले होते. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर दोघेही भारतात परतले आहेत. ते नेमके कुठे फिरायला गेले होते ते स्थळ अद्यापही गुलदस्त्यात आहे. सुट्टीच्या काळात दोघांनीही सोशल मीडियापासून स्वतःला दूरच ठेवले होते. ही जोडी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली. हौशी फोटोग्राफर्सनी त्यांना बोलते करण्याचा बराच प्रयत्न केला पण रणवीर-दीपिकाने मौन बाळगले.