पालघरमध्ये एस टी बस खाली येऊन दुचाकीस्वाराचा मुत्यु; घटना सीसीटीव्हीत कैद - पालघरमध्ये एस टी बस आणि दुचाकीचा अपघात
पालघर - शहरातील हुतात्मा चौकानजीक राम मंदिरासमोर दुचाकीस्वार एसटी बसखाली आल्याने रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. दुचाकीस्वार एसटी बसला ओव्हरटेक करताना बसच्या टायरखाली येऊन हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मिथिलेश प्रमोद सिंग मृत व्यक्तीचे नाव असून ते पालघर मधील रहिवासी आहेत. अपघाताची ही संपूर्ण घटना रस्त्यालगतच असलेल्या रस्त्यालगतच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.