कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सोनू सूद ठरतोय रियल लाईफ हिरो - हजारो लोकांना मदत करतोय सोनू सूद
अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या संकटकाळात आपले परोपकारी मिशन सुरू ठेवले आहे. सोनूने त्याच्याकडे मुंबईतील निवासस्थानी मदतीसाठी विचारणा करणाऱ्यांचा आढावा घेताला. आजवर त्याच्या सूद चॅरीटी फॉउंडेशनने हजारो लोकांना मदत केली आहे. वैद्यकीय साहित्य, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्टेटर्स आणि हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी सोनू सूद लोकांना सक्रियपणे मदत करत आहे.