COVID 19 : अमिताभ बच्चन ते रितेश देशमुख, पाहा सोशल मीडियाद्वारे कलाकारांची जनजागृती - Salman khan
मुंबई - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कलाविश्वातील सेलेब्रिटींनी पुढाकार घेऊन सोशल मीडियाचा आधार घेत जनजागृती केली आहे. नागरिकांनी ही गंभीर परिस्थीती लक्षात घेऊन घराबाहेर न पडण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच, स्वत:सह स्वत:च्या कुटुंबीयाची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, काजोल, रितेश देशमुख यांच्यासह बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे नागरिकाना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.