Video : बर्फवृष्टीत 'जेसीबी'वरुन निघाली 'अजब वरात' !! पाहा व्हिडिओ - जेसीबी वरुन लग्नाची मिरवणूक
सिरमौर/नाहान ( हिमाचल प्रदेश ) - आपण अनेक प्रकारच्या वराती पाहिल्या असतील. परंतु हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात एक अनोखी वरात पाहायला मिळाली. इथे वराने आपल्या वधूला रथ किंवा कारमध्ये न आणता जेसीबीमध्ये आणले होते. खरेतर हिमाचलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद आहेत, त्यामुळे वराला हे पाऊल उचलावे लागले. सिरमौर जिल्ह्यातील जावगा येथून ही मिरवणूक सौन्फर गावात जाणार होती. परंतु, संग्रापासून 8 किमी पुढे बर्फवृष्टीमुळे बंद झालेला रस्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु यश आले नाही. अशा स्थितीत वधू-वर जेसीबीमधून सौनफर गावात पोहोचले. सोमवारी सकाळी सर्व विधी पूर्ण करून ते घरी परतले.
Last Updated : Jan 24, 2022, 6:17 PM IST