कॉलेजमध्ये आयुष्मान होता होमोफोबिक, कार्यक्रमात उलगडले किस्से - Ayushmaan Khurrana news
आयुष्मानच्या आगामी 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात समलैगिंकता हा विषय हाताळण्यात आलाय. बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवणाऱ्या आयुष्मानने ऑनस्क्रिन समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारण्याचे आव्हान स्वीकारले आहे. एका कार्यक्रमात त्याने उलगडा केलाय की कॉलेजमध्ये असताना तो होमोफोबिक होता.