महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आर्यन खानचा जामीन फेटाळला, आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला

By

Published : Oct 20, 2021, 4:32 PM IST

मुंबई - शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन सत्र न्यायालयाने पुन्हा नाकारला आहे. आर्यन खान याचे व्हॉट्सअप चॅट कोर्टात सादर करण्यात आले. पोलिसांना आर्यन खान याच्या व्हाँट्सअप चॅटमध्ये कथीतरित्या ड्रग्जशी संबंधीत काही पुरावे सापडले आहेत. तो एका अभिनेत्रीशी बोलताना हे चॅट झाले असल्याचा एनसीबीचा दावा आहे. आर्यनच्या वकिलांनी त्याच्याकडे ड्रग सापडले नसल्याचा मुद्दा कोर्टासमोर पुन्हा मांडला. मात्र याचा परिणाम कोर्टावर झाला नाही व एनसीबीच्या बाजून निकाल देत कोर्टाने आर्यनला जामीन नाकारला आहे. त्यामुळे आर्यनसोबत अटकेत असलेल्या इतरांनाही या निकालाचा फटका बसणार आहे. अशा प्रकारे आर्यन खान याचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. आर्यनचे वकिल आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठोवण्याच्या तयारीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details