पाहा, मलायका आणि अर्जुनचा पाण्यात सायकलिंगचा व्हिडिओ - अर्जुन आणि मलायका मालदिवच्या सुट्टीवर
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची लव लाईफ लोकांपासून लपलेली नसून दोघे एकमेकांसोबत सतत फोटो शेअर करत असतात. अशातच दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नुकतंच दोघेही मालदीवमध्ये त्यांचा क्वालेटी टाईम स्पेंड करत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे दोघांनीही मालदीवमधील एकही फोटो अद्पाय एकत्र शेअर केला नव्हता. त्यानंतर आता दोघांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर चाहते भरभरुन प्रेम व्यक्त करीत आहेत. या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन पाण्यात सायकलिंग करत असल्याचं दिसून येत आहे. पाण्यात व्यायाम विशेषतः सायकलिंग करणं कठीण असतं, असं म्हटलं जातं. मात्र दोघांच्या व्हिडीओमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.