Exclusive: अनुष्का शर्मा दिसणार क्रिकेटरच्या भूमिकेत, 'झूलन गोस्वामी'च्या बायोपिकची शूटिंग सुरू - कोलकाता येथे झूलन गोस्वामीच्या बायोपिकचे शूटिंग
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा 'झिरो' चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी पडद्यावर झळकणार आहे. यावेळी ती महिला क्रिकेटरच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज राहिलेल्या झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अनुष्का ईडन गार्डन मैदानावर शूटिंग करण्यासाठी रवाना झाली आहे.