अनुप जलोटा - जसलिन मथारूची कथा मोठ्या पडद्यावर, 'या' चित्रपटात साकारणार भूमिका - Anup jalota in vo meri student hai
'बिग बॉस'च्या १२ व्या पर्वात सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी जोडी अनुप जलोटा आणि जसलिन मथारू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या दोघांच्या रोमान्सच्या चर्चांनी बिग बॉसचे १२ वे पर्व खूप गाजले होते. याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. गुरू शिष्याची जोडी लव्ह जोडीमध्ये जमल्यानंतर त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र झळकणार आहे.