“‘मी होणार सुपरस्टार’ : स्पर्धकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करणार - अंकुश चौधरी - Ankush Chaudhary latest news
मराठी सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकुश चौधरीने ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातून मनोरंजनसृष्टी प्रवेश केला होता. त्यानंतर छोटा पडदा आणि मग मोठा पडदा गाजवत सुपरस्टारपद मिळविले. आता तो स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. अंकुश तब्बल १५ वर्षांनी टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेताना दिसेल. स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम सोबत त्याने या शोबाबत गप्पा मारल्या त्याचा हा व्हिडीओ...