पाहा व्हिडिओ : बिपाशा बसूचे वाढदिवस सेलेब्रिशन - बॉलिवूड स्टार बिपाशा बसूचा वाढदिवस
मुंबई (महाराष्ट्र) - सौंदर्यवती अभिनेत्री बिपाशा बसू हिचा आज वाढदिवस आहे. बिपाशाने तिचा वाढदिवस पती करण सिंग ग्रोव्हरसोबत मध्यरात्री साजरा केला. बिपाशाने तिच्या वाढदिवसाचा केक कापताना करणसोबतचा एक प्रेमळ क्षण शेअर केला आहे. बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. डेंजरस या वेब सीरिजमध्ये हे जोडपे शेवटचे दिसले होते.