महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

एसटी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ चुकीची, काँग्रेस विलिनीकरणावर ठाम - श्रीरंग बरगे - एसटी कामगार वेतन श्रीरंग बर्गे प्रतिक्रिया

By

Published : Mar 6, 2022, 10:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

मुंबई - संप काळात जी वेतन वाढ झाली तेव्हा सेवाजेष्ठता पाळली गेली नाही. त्यामुळे, एसटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली व त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. भाजप आमदारांनी मान्य केलेली वेतनवाढ म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व एसटी कामगारांचे नेते श्रीरंग बरगे यांनी 'ईटीवी भारत'शी बातचीत करत असताना केला. नुकताच त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये एसटी महामंडळ शासनात विलिनीकरण करणे शक्य नाही, असे नमूद केल्याने एसटी कामगार चांगलेच आक्रमक झाले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीसुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे, हा संप कोणा विरोधात सुरू आहे? याबाबतीत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व एसटी कामगारांचे नेते श्रीरंग बरगे यांच्याशी खास बातचीत केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details