Gudipadwa 2022 : गुढीपाडवा सणानिमित्त पैठणीची गुढी वस्त्र - गुडीपाडवा 2022
येवला ( नाशिक ) :- येवल्यातील जगप्रसिद्ध पैठणीवर नेहमीच कारागीर विविध कला साकारत असतो. मात्र या वेळेस गुढीपाडवा सणानिमित्त गुढीला जे वस्त्र लागतात ते आता पैठणी वस्त्र येवल्यातील संकेत कोकणे या कारागिराने तयार केले आहेत. त्याने अशा विविध प्रकारच्या डिझाईनचे पैठणी वस्त्र तयार केले असून या वस्त्रांला मोठ्या प्रमाणात येवला शहरासह, महाराष्ट्र तसेच बाहेर राज्यात देखील मागणी आहे. यासाठी स्त्रीया मोठ्या प्रमाणावर गुढीसाठी पैठणी वस्त्र खरेदी करताना दिसत आहे. नेहमीच गुढीवर विविध प्रकारचे वस्त्र नागरिक लावत असतात. मात्र, यावेळी गुढी करता पैठणी वस्त्र देखील बाजारात दाखल झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST