VIDEO : 'जो जो हो शिवराया जो जो...' किल्ले शिवनेरीवर हलला शिवबांचा पाळणा - shiwaji maharaj
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला असून शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर मोठी गर्दी केली आहे. यावेळी शिवबांचा पाळणा हलवण्यात आला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST