Vaibhav Pramukh Beaten by Former Shivsena Corporator - शिवसेनेच्या माजी नगरसेविकेची शिवसेना विभाग प्रमुखास मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
नवी मुंबई - शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने शिवसेना पदाधिकाऱ्यांस बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाचं शिवसेनेत मात्र सेना विरुद्ध सेना असे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी ( Former Shivsena Corporator ) व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपच्या व्यासपीठावरील उपस्थिती आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार स्वीकारतानाचे व्हिडिओ बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी वरिष्ठांना पाठवले होते. याचा राग अनावर झाल्याने भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना 30 मार्चला रात्री बेलापूरमध्ये मारहाण केली. याप्रकरणी शिवसेनेचे बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी 2 एप्रिलला रात्री उशिरा एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून एनआरआय पोलिसांनी माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या 8 समर्थकांवर मारहाण, शिवीगाळ करणे व धमकावणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST