Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : मुंबईच्या महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन - Shivaji Maharaj Jayanti
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ( Shivaji Maharaj Jayanti 2022 ) शिवजन्मोत्सवाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. त्यानिमित्त गेट ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, उपमहापौर अँड. सुहास वाडकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार आदी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST