VIDEO : शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांची काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंच्या कार्यक्रमात हजेरी; पोलीस आयुक्तांचीही भेट घेतल्याने चर्चेला उधाण - Sanjay Raut attend Congress Spokesperson Atul Londhe program
नागपूर - शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत हा नागपुरात ( Shiv sena MP Sanjay Raut in Nagpur ) आले. पण यावेळी कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress SpokesPerson Atul Londhe ) यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ( MP Sanjay Raut Meet Amitesh Kumar ) यांचीही भेट घेतली. आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन काही वेळ आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर ते काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोहोचले. यामुळे राजकीय वर्तुळाकार वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कलगीतुरा सुरू आहे. आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपासह अनेक गंभीर आरोप होत आहे. त्यामुळे काही तासांच्या दौऱ्यात कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पोलीस आयुक्तांशी घेतलेली भेट ही सहज न मानता यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST