Raut vs Somaiya : नाशिकमध्ये शिवसेनेने काढली सोमैयांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा - सोमैया यांची नाशिकमध्ये प्रतिकात्मक अंतयात्रा
नाशिक - आयएनएस विक्रांत ही युध्दनौका देशसेवेतून निवृत्त झाली असून ती भंगारात काढण्याऐवजी तिचे स्मारक बनवावे यासाठी किरिट सोमय्यांनी 58 कोटी निधी जनतेकडून गोळा केला. पण, हा निधी राज्यपालांकडे दिला नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी हा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यानंतर राज्यभरात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये पक्षाच्या शालिमार चौकातील कार्यालयासमोरून आज गुरूवार (दि. 7 एप्रिल)रोजी किरीट सोमैया यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सोमैयांविरोधात मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST