महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : नाशकात राज्यपालांच्या 'त्या' विधाना विरोधात शिवसेनेचे 'जोडे मारो आंदोलन' - नाशिक शिवसेना आंदोलन

By

Published : Mar 2, 2022, 5:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

नाशिक - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. याचे पडसाद नाशिक शहरात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य कार्यालय असलेल्या शालिमार येथील शिवसेना कार्यालया बाहेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कोश्यारी यांचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'चले जाओ चले जाओ हमारे महाराष्ट्र से चले जाओ' अशा घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. राज्यपालांनी लवकरात लवकर महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी या वेळी शिवसैनिकांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details