Shiv Jayanti Special Rangoli : शिवजयंतीनिमित्त प्रतिबिंब रांगोळी काढून कलाकार अवलियाने वाहिली महाराजांना आदरांजली
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची आज (सोमवार) तिथीनुसार शिवजयंती आहे. यासाठी पुण्यातील एका कलाकार अवलियाने त्यांना आपल्या कलेतून आदरांजली वाहिली ( Shiv Jayanti Special Rangoli made in pune ) आहे. श्रीरंग कलादर्पणच्या प्रा. अक्षय शहापूरकर यांनी शिवजयंती निमित्त एक विशेष रांगोळी काढली आहे. अक्षय हे पुण्यातील सुप्रसिद्ध असे रांगोळीकार असून त्यांनी शिवजयंतीनिमित्त प्रतिबिंब रांगोळी म्हणजेच ( Shiv Jayanti Anamorphic Rangoli ) काढून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. या रांगोळीची खासियत अशी आहे की तुम्हाला ती साध्या पद्धतीने बघितल्यास नक्की काय हे समजणार नाही. मात्र या रांगोळीच्या मधोमध ज्यावेळेस एक स्टीलचा पाईप ठेवला जातो. त्याच्यामध्ये त्या रांगोळीचे प्रतिबिंब त्यातून आपला नक्की रांगोळी काय आहे हे समजते, जोपर्यंत तो steel चा pipe मध्ये ठेवला जात नाही, तोपर्यंत चित्र काय आणि कसे काढले आहे हे कळत नाही. ही या रांगोळीची खासियत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST