महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 22, 2022, 9:17 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ETV Bharat / videos

शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी - शिवसेना आमदार सुनील प्रभू

मुंबई - शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. त्यानुसार आज महाराष्ट्रभर शिवसैनिक शिवजयंती साजरी करत आहेत. प्रत्यक शिवसेनाशाखेत आज कार्यक्रम घेतले जात आहेत. आज मुख्यमंत्री विमानतळावर महाराजांच्या पुतळ्याला हार घालून शिवजयंती साजरी करत आहेत. विधानसभा भवनच्या आवारात शेवसेनेचे आमदार देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून शिवजयंती साजरी करत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी काल दिली. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मुद्यावरून भाजपकडून शिवसेनेला डिवचण्यात येत होते. आघाडीसोबत जावून शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत नसल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रभू यांनी सदर प्रतिक्रिया दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details