महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shiv Bhojan Thali : शौचालयात धुतल्या जातात शिवभोजन केंद्रामधील थाळ्या; पाहा VIDEO - शिवभोजन

By

Published : Mar 29, 2022, 2:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

यवतमाळ - गरिबांसाठी सरकारकडून अतिशय महत्वाचा उपक्रम म्हणून चालविल्या जाणाऱ्या शिवथाळी या चक्क शौचालयात धुतल्या जात ( Shiv Bhojan thali Dishes are washed in toilet ) असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांद्वारे हे शिवथाळी भोजन केंद्र चालविले जात असल्याची माहिती आहे. गरिबांसाठी शिवभोजनाच्या नावाखाली गलिच्छ जागेवर स्वयंपाक व जेवणाची भांडी धुणे हा गरिबांची थट्टा करण्याचा प्रकार असून असा किळसवाणा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. शिवथाळीचे भांडे शौचालयात धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात व्हायरल होत असून शासन या प्रकारविरोधात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details