Jalgaon Police Holi Celebration: 'इको फ्रेंडली' धुलीवंदन साजरे करत ढोल-ताशांच्या तालावर थिरकले पोलीस अधिकारी-कर्मचारी - पोलीस कर्मचारी अधिकारी डान्स व्हिडिओ
जळगाव- अत्यंत तणावात नोकरी करणार्या पोलीसांच्या नोकरीत विरंगुळ्याचे अन् उत्सवाचे क्षण कधीतरीच येतात. पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे ( Jalgaon Pravin Mundhe Holi ) यांनी आज आपल्या सहकार्यांसह टिळा लावत इको फ्रेंडली धुलीवंदन ( Ecofriendly Holi in Jalgaon ) साजरा केला. त्यांनी मिठाई देऊन आपल्या सहकार्यांना शुभेच्छा दिल्या. या सुखद धक्क्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले. प्रचंड तणावामध्ये काम करणार्या पोलिसांनी थेट ढोल-ताशांवरच ठेका ( Jalgaon Police Holi celebration ) धरला. यात अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , निरिक्षक रामदास वाकोडे आदीही सहभागी झाल्याने कर्मचार्यांचा उत्साह शिगेला पोहचला. पहा तणावामध्ये काम करणार्या आणि सणासुदीलाही घरी न राहणार्या पोलिसांच्या कामावरील एक विसाव्याचा, विरंगुळ्याचा आणि उत्सवाचा क्षण.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST