Video : 'एव्हढा' मोठा गव्यांचा कळप पाहिलाय? पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे अनेक गव्यांचे दर्शन - गवे वाघवे अभयारण्य
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. दिवसाढवळ्या एका पाठोपाठ एक असे 30 हुन अधिक गव्यांचे दर्शन झाले. पहिल्यांदाच एव्हड्या मोठ्या कळपाचे पन्हाळा तालुक्यातील वाघवे पैकी खोतवाडी या परिसरात दर्शन झाले. राधानगरी- आजरा परिसरातील अभयारण्यात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. अनेक वेळा त्यांचे अशा पद्धतीने दर्शन होते. मात्र पन्हाळा तालुक्यात पहिल्यांदाच एव्हडे गवे एकाचवेळी दिसले आहेत. दरम्यान, यावेळी शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी गव्यांना जंगलाच्या दिशेने उसकवून लावले पाहुयात...
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST